साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंना ” भारतरत्न ” पुरस्काराने सन्मानित करा : संभाजी ब्रिगेड

दि.१ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची या वर्षीच जन्मशताब्दी वर्ष आपण साजर करत असून याच अवचित्य साधून त्यांना भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात याव अशा मागणीच निवेदन आज उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी दारव्हा यांच्या मार्फत विद्यमान मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे यांना देण्यात आलं.
साहित्यसम्राट लोकशाहीर स्व. श्री. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी लौकिक आणि मराठी मुलुखाची पताका साता समुद्रापार नेण्यात फार मोठ योगदान दिल आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम मधे लोकशाहीर यांनी आपल्या प्रबोधन आणि लोकजागर उपक्रमातुन शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना चळवळीत मोठा वाट निभावला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे लोक वांग्मय,कथा,कादंबरी,लोकनाट्य,गाणी,नाटक,पटकथा,पोवाडे,लावण्या, इ. लिखाण आणि समाज प्रबोधिनाची अफाट शैली ही महाराष्ट्राची मान उंचावणारी आहे. आशा लोक सेवकास मरणोत्तर भारतरत्न जाहीर करावा अशी तमाम महाराष्ट्र वासियांची अभिलाषा मा. मुख्यमंत्र्यांनी शिफारस करून केंद्र शासना कडे पाठवावा म्हणून दारव्हा तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेकडून करण्यात आला या पार्श्वभूमी वर लोकशाहीर साहित्य परिषद, संभाजी ब्रिगेड, लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटने कडून संयुक्त निवेदन देण्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष शिवश्री. अमोलदादा पावडे पाटील, लोकशाहीर साहित्य परिषदे चे श्री अक्षयभाऊ तेलंगे, लहुजी शक्ती सेनेचे श्री रविभाऊ खडसे, संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष शिवश्री. अनिल मोहिते पाटील, मोहनराव झोंबाडे, गोपाल गायकवाड, रोहित भाऊ राठोड, अमोल भाऊ इंगळे, इकबाल शेख, शोएब शेख, ईश्वर तेलंगे इ. पदाधिकारी उपस्थित होते.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना देशाच्या सर्वच्च नागरी भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा – संभाजी ब्रिगेड

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना देशाच्या सर्वच्च नागरी भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी आज दि.31-7-2020 रोजी संभाजी ब्रिगेड किनवट शाखेच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांना मा.सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले…

संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
बालाजी पाटील सिरसाट
संभाजी ब्रिगेडचे किनवट तालुकाध्यक्ष
सचिन पाटील कदम
शंकर भंडारे,आदर्श जागरलावार,ब्रम्हा येडके उपस्थित होते.

पोवाडे लावण्या गीतं पद या काव्यप्रकारांचा त्यांनी सन्मान कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली.त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे भारतीय भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झालेच पण धर्मजातीच्या देशकाळाच्या सीमा ओलांडून ते जर्मन झेक इंप्लिश स्लोव्हाक पोलिश रशियन या परकीय भाषांमध्ये भाषांतरित झाले.

रशियन सरकारने त्यांचा रशियात बोलावून यथोचित सत्कार केला होता,रशिया दरवर्षी त्यांची जयंती साजरी देखील केली जाते.पुरोगामी व बहुजनवादी समाजाचे महत्वाचे स्फूर्तीस्थान असलेले महानायक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मानाने पुरस्कृत करण्यात यावे ही आग्रहाची विनंती करण्यात आली.

नांदेड-लातुर राष्ट्रीय महामार्ग 361वरील खड्डे बुजवा :सुभाष पाटील कोल्हे जिल्हासचिव संभाजी ब्रिगेड


नांदेड- लातुर या राष्ट्रीय महामार्गा 361 चे गत एक वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग च्या कामाचे टेंडर सुटूनही काम अद्याप पर्यंत चालू केले नाही.या राष्ट्रीय महामार्गा वर मोठ मोठे खड्डे पडले असून रस्तात खड्डा कि खड्डात रस्ता आहे हे सांगणे कठीण आहे या राष्ट्रीय महामार्गावर खड्डामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नांदेड-लोहा रोडवरील खड्डे तात्काळ बुजवावे या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा सचिव सुभाष कोल्हे यांनी नांदेड येथील प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण परीयोजना कार्यालय ईकाई नांदेड यांना निवेदन देऊन केली आहे.या नॅशनल हायवे वर लोहा शहर असून लोहा शहरातील पुर्ण बाजारपेठ या नॅशनल हायवेच्या आजुबाजुला आहे त्यामुळे नागरिकांची वर्दळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. रस्ता वर गाडी चालवताना नागरिकांना धुळीमुळे श्र्वसनाचे त्रास होत आहेत वाहन चालवताना धुळीमुळे 50 मिटर समोरील गाडी सुध्दा वाहनचालक दिसत नाही. प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना ईकाई अधिकारी यांनी नांदेड- लोहा रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम 10 च्या आत सुरू केले नाही तर संभाजी ब्रिगेड च्या वतीने वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड चे जिल्हा सचिव सुभाष कोल्हे यांनी दिला यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्र्वर पाटील, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाटील शिंदे, नांदेड उत्तर तालुकाध्यक्ष मोहन शिंदे कमलेश पाटील कदम, किरण बाबर यांच्यासह संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोणा असाच वाढत राहाला तर मात्र विद्यापीठ अंतर्गत परीक्षांचे नवीन वेळापत्रक कोसळायला वेळ लागणार नाही – शुभम शेरकर संभाजी ब्रिगेड जिल्हासचिव अमरावती

विद्यापीठ,महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक (University College And CET Exams) दोन दिवसात जाहीर होणार, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असंही शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे,मात्र सध्या राज्यात कोरोणा नियंत्रणात येत नसून रोज नवीन कोरोणा पॉझीटिव्ह केस सापडत आहेत.आधी कोरोनाच्या वाढीबरोबरच महाराष्ट्रातील विद्यापीठ परीक्षांचे वेळापत्रक स्थगित करण्यात आले होते त्याच प्रमाणे कोरोणाचा वाढता प्रभाव बघता दोन दिवसात जाहीर होणारे नवीन वेळापत्रक सुध्दा भविष्यात कोसळणार अशी भीती शुभम शेरकर यांनी व्यक्त केली आहे. विद्यापीठ, महाविद्यालयीन परीक्षा विद्यार्थ्यांच्या आरोग्याला लक्ष्यात घेऊनच घ्याव्या याबद्दल संभाजी ब्रिगेड आग्रही आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading “कोरोणा असाच वाढत राहाला तर मात्र विद्यापीठ अंतर्गत परीक्षांचे नवीन वेळापत्रक कोसळायला वेळ लागणार नाही – शुभम शेरकर संभाजी ब्रिगेड जिल्हासचिव अमरावती”

वर्धा जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान

संभाजी ब्रिगेड साखळी रक्तदानाचा चौथा टप्पा
रक्तदाते …
समीरभाऊ राऊत (संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याधक्ष्य )
विजूभाऊ नाईक (क्लर्क सेवाग्राम हॉस्पिटल)
प्रशांतभाऊ राऊत (ECG टेक्निशीअन सेवाग्राम हॉस्पिटल )
अनिलभाऊ नाईक (क्लर्क सेवाग्राम हॉस्पिटल)
रक्तदान करायचे असल्यास संपर्क

राहुलभाऊ गजभिये :- 9049976104
संभाजी ब्रिगेड वर्धा

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; संभाजी ब्रिगेड,विर भगतसिंह विद्यार्थी परिषदेची मागणी

अमरावती – दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी द्या, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडने आज(६ नोव्हेंबर) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिले.
परतीच्या पावसामुळे राज्यात २०१९-२० च्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीने बाधित शेतकरी कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडने आज(६ नोव्हेंबर) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिले. तसेच सदर शुल्क माफीसाठी आवश्यक निधी राज्य सरकारने वेळेवर शिक्षण मंडळास उपलब्ध करुन द्यावा, की जेणेकरुन परिक्षा शुल्क माफीची रक्कम योग्य वेळी त्यांच्या हातात पडेल. मात्र त्या दृष्टीने विद्यापीठामार्फत प्रयत्न होणे गरजेचे आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा महासचिव शुभम शेरकर यांच्यासह वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष अक्षय खडसे, नीलेश सोनटक्के, कृणाल गावंडे, अजित काळपांडे, अभिषेक आकोडे, सुरज भोयर, मयुर मेश्राम, रोषण माहुरे, अंकित भुजाडे, अभिषेक तांदळे, अश्विनी बीजेवार, करण पचलोरे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

पीक विमा आणि हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा दिवसात जमा करा तर आणि तरच शिवछत्रपतींचे नाव घ्या.ऍड.गणेश हलकारेमाजी प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

अमरावती: परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे, शेतकऱ्यांची उभी हाती आलेली पीक पावसाने कुजले आहे,कुठे वाहून गेले आहे तर कुठं सोंगुन ठेवलेल्या पिकाला शेतातच कोंब आलेले आहेत, तरीही छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेले सध्याचे सरकार सरकार शेतकऱ्यांन समोरील या विदारक परिस्थितीचे गांभर्य समजून घेत नाही आहेत, जर सरकार शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत नसतील तर शिवरायांचे नाव घेण्याचे सरकारला काहीही अधिकार नाहीत, सरकारने त्वरित पस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पिक विमा व 50 हजार रुपये प्रति हेक्‍टर मदत त्यांच्या खात्यात जमा करावी असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष ऍड. गणेश हलकारे यांनी आज अमरावती येथे केले.

आता आपलाच दांडा आणि आपला झेंडा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड पक्ष मैदानात.

कळंब: आरं शेतकऱ्यांच्या पोरा तु पुढं चाल रं…!
डॉ.पल्लवी तांबारे

संभाजी ब्रिगेडच्या एन्ट्रिनं..महाराष्ट्रात निवडणूकांच वातावरण टाईट…संभाजी ब्रिगेडची दुसरी यादी जाहीर..

संभाजी ब्रिगेडची विधानसभेची १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर.
डॉ.शिवानंद भानुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती.

औरंगाबाद :- संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची १५ सप्टेंबर रविवार रोजी प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद येथील कार्यालयात बैठक संपन्न झाली. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या दुसऱ्या यादीवर शिक्कामोर्तब केले असल्याचे औरंगाबाद येथे १६ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी सांगितले व त्यानंतर १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यापूर्वी संभाजी ब्रिगेडने १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे.
डॉ. शिवानंद भानुसे पुढे म्हणाले की, संभाजी ब्रिगेड विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पंचवीस वर्ष दुसऱ्यांसाठी लढलो, आता स्वतःसाठी, जिंकण्याकरीता आम्ही निवडणुका लढणार आहोत.राज्यभर संपर्कप्रमुखानी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वच पक्षाबरोबर ‘संभाजी ब्रिगेड’चे वरिष्ठ नेते चर्चा करत आहेत. सन्मानजनक जागा मिळाल्या तर ठिक अन्यथा स्वतंत्र स्वबळावर लढणार किंबहुना विविध समविचारी घटकांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी निर्माण करणार.
संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन अधिकृत चिन्ह मिळाले आहे.
आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक लढवीत असल्याचे,डॉ.शिवानंद भानुसे म्हणाले.
उमेदवारांची यादी
०१) रिसोड मालेगाव(३३) (वाशिम) डॉ. प्रशांतकुमार उत्तमराव गावंडे
०२) वाशिम मंगरूळपीर(३४) (वाशिम) राहुल जयकुमार बलखंडे
०३) वणी(७६) (यवतमाळ) अजय पांडुरंजी धोबे
०४) लोहा-कंधार(८८) (नांदेड) सुभाष भगवानराव कोल्हे
०५) देगलूर बिलोली(८९)(नांदेड) सूर्यकांत मारुती चंद्रे
०६) मुखेड (९०)(नांदेड) बालाजी जनार्धन आगलावे
०७)औरंगाबाद पूर्व(१०९)(औरंगाबाद) रमेश तात्याराव गायकवाड
०८)कल्याण पश्चिम(१३८)( ठाणे) डॉ. अमितकुमार गोविलकर
०९)ओहळा माजिवडा(१४६)( ठाणे) विकास कृष्णा मुकादम
१०) भोर वेल्हा मुळशी(२०३)(पुणे) पंढरीनाथ संपत सोंडकर
११) पुणे कॅन्टोन्मेंट(२१४)( पुणे)(राखीव S.C.) सौ रंजना सुभाष जाधव
१२) माजलगाव(२२९) (बीड) छत्रभुज परमेश्वर देशमुख
१३) परळी(२३३)(बीड) गोविंद निंबाजी पोतंगले
१४) औसा(२३९)( लातूर)अभिमन्यू शेषराव पवार

ओ.बी.सी ची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना भारत सरकारने त्वरीत करावी – संभाजी ब्रिगेड

अमरावती: ओ.बी.सिंची स्वतंत्र जाती निहाय जनगनना घेण्यात यावी,MPSC UPSC च्या अंतर्गत आंदोलनास बसलेल्या सर्व मराठा समाजातील मुलांचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत व अभीयांञीकी,वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत अनू.जाती, जमाती प्रमाने ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क सवलत देण्यात यावी तसेच अन्य महत्वाच्या मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेड अमरावती जिल्ह्याच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेबांना देऊन, मुख्यमंत्र्याना पाठवण्यात आले.

जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करतांना संभाजी ब्रिगेड अमरावती चे महासचिव शुभम शेरकर

काही मुद्दे खालील प्रमाणे
●श्री.राजनाथसिंह, गृहमंत्री भारत सरकार यांनी दि.०१-०९-२०१९ रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहिर केल्याप्रमाणे २०२१ मधे ओबीसींची स्वतंत्र्य जाहिनाय जनगनना करण्यात यावी.

●मंडळ आयोगाच्या शिफारशीची १००% अंमलबजावणी करण्यात यावी.

●वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेत ओबीसी ला २७% आरक्षण देण्यात यावे.

ओबीसी वरिल क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट त्वरीत रद्द करण्यात यावित.

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रणजीत तिडके, जिल्हासचिव शुभम शेरकर,जिल्हा उपाध्यक्ष कुशल देशमुख,महानगरप्रमुख संजय ठाकरे शरद काळे, जिल्हा संघटक मनोज सोळंके कृनाल गावंडे,महानगर कार्याध्यक्ष सुयोग वाघमारे, तालुका उपाध्यक्ष अजित कालबांडे उपस्थित होते.

SambhajiBrigadeAmravati

Design a site like this with WordPress.com
Get started